कोयना व पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस आज रद्द | पुढारी

कोयना व पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस आज रद्द

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  मिरज-पुणे रेल्वेमार्गावर सांगली ते नांद्रे दरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी धावणारी पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस आणि मुंबई-कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांगलीतील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपूल देखील पाडण्यात येणार आहे. या ठिकाणी सध्या नवीन रेल्वेमार्ग टाकण्याचे काम करण्यात येत आहे. गुरुवारी ते काम जलदगतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे-कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस, बेंगलोर-जोधपूर एक्स्प्रेस मिरज-कुर्डुवाडी मार्गे धाावणार आहे. त्यामुळे ही गाडी मिरज-पुणे रेल्वेमार्गावर रद्द करण्यात आली आहे.

Back to top button