सांगली : क्रेन अंगावरून गेल्याने वृद्ध ठार

सांगली : क्रेन अंगावरून गेल्याने वृद्ध ठार

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  मिरज-कृष्णाघाट रस्त्यावर क्रेन अंगावरून गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हुसेन अलीसाब इनामदार (वय 65) असे त्यांचे नाव आहे. यानंतर संतप्त नातेवाईकांनी क्रेनवर दगडफेक करून काचा फोडल्या.

याबाबत माहिती अशी की, मिरज-बेळगाव रेल्वेमार्गावर मिरज-कृष्णाघाट दरम्यान रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सोमवारी दुपारी रेल्वे जाणार असल्याने रेल्वेगेट बंद करण्यात आले होते. रेल्वेगेट उघडल्यानंतर हुसेन इनामदार हे त्या ठिकाणाहून सायकलवरून निघाले होते. तर रेल्वेच्या कामासाठी आलेला क्रेन देखील निघाला होता. यावेळी सायकलवरून निघालेल्या इनामदार यांना क्रेनची धडक बसली. त्यानंतर ते क्रेनच्या चाकाखाली आहे. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर क्रेन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच इनामदार यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नातेवाईकांनी रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी आणलेल्या क्रेनवर दगडफेक करून काचा फोडल्या. याप्रकरणी महत्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली
आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news