सांगली जिल्ह्यातील गार्डी गावात विधवा प्रथा बंदी | पुढारी

सांगली जिल्ह्यातील गार्डी गावात विधवा प्रथा बंदी

विटा : पुढारी वृत्तसेवा : पतीच्या निधनानंतर महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे या विधवा प्रथा आता बंद करण्याचा महत्वाचा निर्णय सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता.खानापूर) गावाने घेतला आहे.

गार्डी ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेत गावातील विधवा (पतीच्या निधनानंतर महिलांना केले जाणारे संबोधन) महिलेच्या कपाळावरील कुंकू पुसणे, हातातील बांगड्या फोडणे या प्रथा बंद करण्याचा ठराव केला आहे. काही दिवसापूर्वी निवास प्रकाश चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यांच्या पत्नी उज्वला, एक मुलगा, मुलगी आहे. याच्यानंतर हा महत्वाचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाने १८ मे २०२२ रोजी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव केला होता. या ठरावाचे पालन करत गार्डी गावच्या सर्वांनी मिळून प्रथा बंद करून नवा आदर्श निर्माण केला आहे. २१ व्या शतकातील नवा आदर्श समाजासाठी एक मार्गदर्शक ठरणार आहे.

गार्डी गावात विधवा प्रथा कायमची बंद करण्यात आली आहे. यासाठी गावाने पुढाकार घेत महिलांसाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयला अनेक महिलाही पाठिंबा दिला आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे यासाठी गार्डी गावाने हा मोठा पुढाकार घेत हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

Back to top button