Sangli Jewelers robbery: सीसीटीव्हीतून महत्त्वाचे धागेदोरे समोर | पुढारी

Sangli Jewelers robbery: सीसीटीव्हीतून महत्त्वाचे धागेदोरे समोर

सांगली: पुढारी वृत्तसेवा : सांगली – मिरज रोडवरील रिलायन्स ज्वेलर्सवर गोळीबार करून भरदिवसा आज (दि.४) दुपारी दरोडा टाकण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. दरम्यान, सीसीटीव्हीतून काही महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. सीसीटीव्हीत एक संशयास्पद व्यक्ती दिसून आली आहे. Sangli Jewelers robbery

सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सवर आज ( दि. ४ ) भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला. दराेडेखाेरांनी गोळीबार करत अख्खे दुकान लुटले. दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घातले. संपूर्ण दुकान लुटून गोळीबार करत दरोडेखोर पसार झाले. या फिल्मी स्टाईल दरोड्यांनी सांगली जिल्हा हदरला आहे.

Sangli Jewelers robbery : झाड तोडण्यासाठी रस्ता बंद केल्याचा घेतला फायदा

सांगली -मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. या रस्त्यावरील एक झाड आज दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्‍यात आला होता. त्याचा फायदा घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला.

दरोडेखोरांनी दुकानातील कर्मचाऱ्यांना बांधून घातले.  दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटले आहेत. या वेळी एका ग्राहकाने दुकानातून पलायन करण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी ग्राहकाच्‍या दिशेने दरोडेखोरांनी  गोळीबार केला. ताे थाोडक्‍यात बचावला. मात्र शाोरुमच्‍या तळमजल्‍यामध्‍ये पडून जखमी झाला आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले; परंतु दुकानाबाहेर श्वान घुटमळले. दरम्यान, दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथक रवाना करण्यात आली आहेत.

हेही वाचा 

सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा : गोळीबार करत दुकान लुटले, पलायनच्‍या प्रयत्‍नात ग्राहक जखमी

सांगली : चारचाकी खड्ड्यात कोसळून दोघेजण ठार; एक जण जखमी

सातारा: प्रतापसिंहनगरात भंगार व्यावसायिक विक्रम पैलवान यांच्यावर जीवघेणा हल्ला

Back to top button