सांगली : राजारामबापू साखर कारखाना एफआरपीमध्ये खोडा घालत असतो | पुढारी

सांगली : राजारामबापू साखर कारखाना एफआरपीमध्ये खोडा घालत असतो

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा

सांगली राजारामबापू साखर कारखाना : जिल्ह्यातील साखर कारखाने एकरकमी एफआरपी देण्यासाठी तयार आहेत.मात्र, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील हेच जिल्ह्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देवू देत नाहीत, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे यांनी येथील पत्रकार बैठकीत केला.

जिल्ह्यातील कारखानदारांनी एकरकमी एफआरपी जाहीर करावी; अन्यथा स्वाभिमानी संघटना आंदोलन करून कारखाने बंद पाडेल असा इशाराही यावेळी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

सांगली राजारामबापू साखर कारखाना : स्वाभिमानीचा आरोप

यावेळी राज्यप्रवक्ते एस् .यु. संदे, भागवत जाधव,जगन्नाथ भोसले, बाळासाहेब जाधव, रमेश पाटील, आनंद जगम, विक्रांत कबुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष मोरे म्हणाले, गेल्या हंगामात ही एफआरपी संदर्भात राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पाटील हे खोटे बोलले होते. या कारखान्याच्या विरोधात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात खदखद आहे. कारखाना कोणत्याही धनदांडग्याचा असला तरी त्यांनी आहिरभावत राहू नये. एफआरपीसाठी संघर्ष करायला आम्ही तयार आहोत.

राज्यप्रवक्ते संदे म्हणाले, शेतकरी आणि कारखादारही जगले पाहिजेत असे आमचे धोरण आहे. करोना, महापूराने शेतकरी अडचणीत आहेत. साखरेचे दर वाढले आहेत. शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली आहे. त्यांच्यामध्ये दराची स्पर्धा लागली आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदार तोंडाला कुलूप लावून आहेत. कारखानदार जोपर्यंत एकरकमी एफआरपी जाहीर करत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसतोड घेऊ नये, वाहतूक दारांनी वाहने बंद ठेवून सहकार्य करावे. स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करून कारखाने बंद पाडू.

हेही वाचलत का?

Back to top button