सांगली : ‘पुढारी’ एज्यु दिशा : नामांकित शैक्षणिक संस्था एकाच छताखाली | पुढारी

सांगली : ‘पुढारी’ एज्यु दिशा : नामांकित शैक्षणिक संस्था एकाच छताखाली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दहावी आणि बारावीनंतर नेमके काय करावे? कोणत्या शाखेला जावे? ते जाण्याचे मार्ग कोणते? करिअरच्या संधी आणि त्या देणार्‍या संस्था कोणत्या, याबाबत विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन देणारे दैनिक ‘पुढारी’ एज्यु दिशा हे तीन दिवसांचे प्रदर्शन सांगलीत कच्छी समाज भवन, (राम मंदिर चौक) येथे 2 जूनपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा समजल्या जाणार्‍या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आता दहावीचा निकालही लवकर जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढे काय करायचे, याचे वेध विद्यार्थी व पालक यांना लागले आहेत. या पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ एज्यु दिशा या तीन दिवसांच्या शैक्षणिक प्रदर्शनचे आयोजन दैनिक ‘पुढारी’तर्फे दि. 2 जून पासून करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यभारातील नामांकित शैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. प्रदर्शनात विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.

दहावी, बारावीनंतर पाल्याच्या शैक्षणिक भवितव्याची काळजी पालकांना असते. त्यासाठी ते विविध पर्याय व मार्ग शोधत असतात. दिवसें-दिवस स्पर्धा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत दै. ‘पुढारी’ एज्यु दिशा या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेध घेणारे शैक्षणिक प्रदर्शन खूप महत्त्वाचे ठरणार आहे. हे प्रदर्शन 2 जूनपासून सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत होणार आहे.

संजय घोडावत युनिव्हर्सिटी, कोल्हापूर हे मुख्य प्रायोजक असून प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. एमआयटी/ एडीटी युनिव्हर्सिटी पुणे आणि पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी पुणे सहयोगी प्रायोजक आहेत. अशोकराव माने ग्रुप, अंबप आणि चाटे शिक्षण समूह सहप्रायोजक आहेत.

तीन दिवसांच्या शैक्षणिक प्रदर्शनात करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी व शंकांचे निरसन करणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे उच्च ध्येय उराशी बाळगलेल्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. अधिक माहितीसाठी परितोष 9766213003 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विविध अभ्यासक्रमांची माहिती

प्रदर्शनात महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतरच्या शिक्षणाचे विविध पर्याय, कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी व्यवस्थापन, औषध निर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल आर्किटेक्चर, अ‍ॅग्रिकल्चर, माहिती तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, अनिमेशन यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती एका छताखाली उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय नीट, जेईई, सीईटीसह स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करणार्‍या संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.

Back to top button