सांगली: अतिक्रमण भोवले; डोंगरसोनी येथील सरपंचासह ५ सदस्य अपात्र | पुढारी

सांगली: अतिक्रमण भोवले; डोंगरसोनी येथील सरपंचासह ५ सदस्य अपात्र

तासगाव: पुढारी वृत्तसेवा : वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत डोंगरसोनीच्या (ता. तासगाव) सरपंच राणी विलास झांबरे यांच्यासह ५ सदस्यांचे जिल्हाधिकारी डॉ. एम राजा दयानिधी यांनी सदस्यत्व रद्द केले.

इतर अपात्र सदस्यांमध्ये अजय शंकर मोहिते, सुधाकर संभाजी शिंदे, सुनिता राजाराम झांबरे, शितल विनायक बोडके या चार ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान सदरचा आदेश मान्य नसल्यास या सदस्यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे १५ दिवसांच्या आत अपील दाखल करावे असे, या आदेशात म्हटले आहे.

गुलाब नामदेव सुर्यवंशी यांनी सरपंच राणी विलास झांबरे यांच्यासह सहा सदस्यांनी वन विभागाच्या जागेत अतिक्रण केल्याचा आरोप करत सर्वांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणी केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीअंती सदस्यांना अपात्र घोषित केले. तर पूजा अविनाश चव्हाण यांनी अतिक्रमण केल्याचे सिध्द होत नाही. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात येत नाही. असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा 

Back to top button