सांगली : बोगस लग्ने लावणार्‍या टोळीचा सांगलीत पर्दाफाश

सांगली : बोगस लग्ने लावणार्‍या टोळीचा सांगलीत पर्दाफाश

Published on

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  एकाच महिलेचे तिघांशी लग्न लावून नवरदेवांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक करणार्‍या टोळीचा विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. पीडित महिला इचलकरंजीतील असून, तिची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी कराड व खानापूर तालुक्यांतील दोघांना अटक केली आहे.

वर्षा बजरंग जाधव (रा. सुलतानगादे, ता. खानापूर) व शंकर बाबुराव थोरात (वसंतगड, ता. कराड) अशी त्यांची नावे आहेत. पीडित महिला इचलकरंजीत जवाहरनगर येथे राहते. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगलीत बोलावून घेतले. 'नोकरी करून तुला किती पैसे मिळणार, त्यापेक्षा तुझे दुसरे लग्न लावून देतो,' असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news