सांगली जिल्ह्यात १११९ कोरोनामुक्त तर ९४५ नवे रुग्ण | पुढारी

सांगली जिल्ह्यात १११९ कोरोनामुक्त तर ९४५ नवे रुग्ण

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 945 रुग्ण सापडले. आज 25 जणांचे बळी गेले. 983 जण गंभीर आहेत. 1119 जण कोव्हिडमुक्त झाले. लसीकरण मंदगतीने सुरू आहे.

जिल्ह्यात आजअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 56 हजार 998 झाली आहे. सध्या 9 हजार 811 व्यक्ती उपचाराखाली आहेत. आज आरटीपीसीआरच्या 3304 तपासण्या करण्यात आल्या. यातील 404 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 9 हजार 421 जणांच्या अँटिजेन टेस्ट केल्या. यात 562 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले.

आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय : आटपाडी : 53, कडेगाव : 108, खानापूर : 99, पलूस : 86, तासगाव : 58, जत : 53, कवठेमहांकाळ : 77, मिरज : 91, शिराळा : 60, वाळवा : 134, सांगली शहर : 98, मिरज : 28.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 7, सातारा जिल्ह्यातील 5, सोलापूर जिल्ह्यातील 5, कर्नाटकमधील 4 अशा 21 पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरू आहेत. होम आयसोलेशनमध्ये 8133 व्यक्ती आहेत. म्युकर मायकोसिसचा आज एकही रुग्ण मिळाला नाही. या आजाराचे जिल्ह्यात एकूण 310 रुग्ण झाले आहेत. तसेच एकूण 29 बळी गेलेआहेत.

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचा आकडा कमी होत चालला आहे. आज सांगली जिल्ह्यातील 25 जणांचे बळी गेले. यात आटपाडी तालुक्यातील 2, कडेगाव तालुक्यातील 1, खानापूर तालुक्यातील 2, तासगाव तालुक्यात 3, जत तालुक्यातील 1, कवठेमहांकाळ तालुक्यात 2, मिरज तालुक्यातील 4, वाळवा तालुक्यात 7, सांगली शहरात 2, कुपवाडमधील 1 अशा 25 व्यक्तींचा मृत्यूझाला.

तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडी:9299
जत : 12062
कडेगाव : 11192
कवठेमहांकाळ : 8236
खानापूर : 12165
मिरज : 16932

पलूस : 8753

शिराळा : 9286
तासगाव : 11939
वाळवा : 23001
महापालिका क्षेत्र : 34,133

Back to top button