सांगली : आटपाडीत पाण्याच्या टाकीमध्ये पडून लहान बालकाचा मृत्यू 

सांगली : आटपाडीत पाण्याच्या टाकीमध्ये पडून लहान बालकाचा मृत्यू 

आटपाडी, पुढारी वृत्तसेवा : पाटील मळा आटपाडी येथील शंभू संदीप पाटील या दीड वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ४ वाजण्यापूर्वी ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, अमोल एजन्सीचे संदीप रावसाहेब पाटील यांचा लहान मुलगा दुपारी घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तो घरासमोरील अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीमध्ये पडला.

बराच वेळ झाला तरी बाळ दिसत नाही म्हणून घरातील लोकांनी त्याचा शोध घेतला. नंतर बाळ पाण्याच्या टाकीत पडल्याचे दिसताच त्याला बाहेर काढण्यात आले. परंतू त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. लहान बालकाच्या मृत्युमुळे पाटील मळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news