सांगली: आटपाडी येथे विवाहित महिलेचा लॉजमध्ये मृत्यू : संशयिताला अटक | पुढारी

सांगली: आटपाडी येथे विवाहित महिलेचा लॉजमध्ये मृत्यू : संशयिताला अटक

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडी शहरातील एका लॉजवर सत्तावीस वर्षीय महिलेचा मृतदेह आज (दि. ६) सकाळी आढळून आला. छाया मधुकर देवडकर (वय २७, रा. विठ्ठलनगर, आटपाडी) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत एका संशयितास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आटपाडी शहरातील एका लॉजमध्ये गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास छाया देवडकर व नानासो हणमंत देवडकर (वय ३३, रा. पिंजारी वस्ती, निंबवडे) राहण्यासाठी आले होते. त्यांनी खोली बूक केली होती. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून ते खोली बाहेर आले नव्हते. हॉटेल कर्मचाऱ्यांनीही दरवाजा उघडून पाहिलेला नव्हता. दरम्यान, शनिवारी सकाळी खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता छाया देवडकर हिचा मृतदेह आढळून आला.

त्यानंतर लॉजची खोली बुक केलेल्या नानासो देवडकर याला संशयित म्हणून आटपाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक एस. व्ही.वर्धन करत आहेत. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.

हेही वाचा 

Back to top button