

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी वाळवा तालुक्यात चुरशीने मतदान सुरु आहे. दुपारपर्यंत ७४.५६ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत सुरु आहे.
तालुक्यात १३ मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. कमी मतदान असलेल्या हमाल-तोलाई गटात जास्त चुरस पाहायला मिळत आहे.
एकूण ४७५२ मतदानापैकी दुपारी २ वाजेपर्यंत ३५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी रंजना बारहते यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
हेही वाचा