सांगलीत महिलेचा गळा दाबून खून, मानलेल्या पतीला अटक - पुढारी

सांगलीत महिलेचा गळा दाबून खून, मानलेल्या पतीला अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा

येथील गोकुळ नगरमध्ये काली उर्फ काजल मोहन गुदररावत या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. या प्रकरणी संबंधित महिलेचा मानलेला पती जुबेद अब्दुलवाहिद सवार (वय 30, रा. सध्या खानभाग )या संशयितास अटक करण्यात आलेली आहे.

पोलिसांनी सांगितले सोमवारी रात्री उशिरा काजल आणि जुबेद यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यात रागाच्या भरात त्याने काजलचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मंगळवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला.

काजलने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे भासवण्यात आले. मात्र शवविच्छेदन करताना काजलने आत्महत्या नव्हे तर तिचा खून करण्यात आल्याचं निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून जुबेदला ताब्यात घेतले.

त्याची कसून चौकशी केली असता त्याने भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात खून केला असल्याची कबुली दिली.

हे ही वाचलं का ?

Back to top button