सांगली : आष्टा येथे होणार एमआयडीसी

सांगली : आष्टा येथे होणार एमआयडीसी

आष्टा; पुढारी वृत्तसेवा :  हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शाहूवाडी (जि. कोल्हापूर) व आष्टा (जि. सांगली) या दोन ठिकाणी एमआयडीसीला शासनाच्या उद्योग विभागाने मंगळवारी तत्वता मान्यता दिली. मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. खासदार धैर्यशील माने यांच्या मागणी नुसार ही बैठकीत आयोजिली होती.

शाहूवाडीसह हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील आष्टा (ता. वाळवा) येथे एमआयडीसी व्हावी, अशी सुशिक्षित बेरोजगार तरुणांची खूप वर्षापासूनची मागणी होती. या एमआयडीसीसाठी खासदार माने प्रयत्नशील होते. मजले (ता. हातकणंगले) येथे नियोजित पोर्ट करिता जमीन एमआयडीसीमार्फत महामार्ग प्राधिकरणला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधितांना विभागणी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्याची माहिती खासदार माने यांनी दिली.

उद्योग विभागाच्या अधिकार्‍यांसह कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकार्‍यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिलेे आहेत. त्यानुसार गुरुवार 20 एप्रिलरोजी शाहूवाडी, आष्टा तसेच मजले येथील जागेची पाहणी केली जाणार आहे. शाहूवाडी हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथील तरुणांना मुंबई येथे रोजगारासाठी जावे लागत आहे. या तरुणांना या आपल्याच तालुक्यात रोजगार मिळावा, यासाठी एमआयडीसीची मागणी होत होती.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील मजले येथे शासनाच्या गायरान जमिनी मध्ये सॅटेलाईट पार्क उभारण्याची मागणी खासदार माने यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली. पान 7 वर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news