सांगली : महाविद्यालयीन तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक | पुढारी

सांगली : महाविद्यालयीन तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांना अटक

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  मतकुणकी (ता. तासगाव) येथील राजवर्धन राम पाटील (वय 18) या महाविद्यालयीन तरुणाचा कोयता व चाकूने हल्ला करून भरदिवसा खून करणार्‍या पाच हल्लेखोरांना 24 तासात अटक करण्यात संजयनगर पोलिसांना यश आले. रागाने पाहण्याच्या कारणावरून राजवर्धनचा खून केल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली आहे.

अटक केलेल्यामध्ये सौरभ आनंदा कोळेकर (वय 20, जगदाळे प्लॉट, संजयनगर, सांगली), शैलेश शामराव हाक्के (20, पाचोरे प्लॉट, संजयनगर, सांगली), वरद संजय सकट (19, कुपवाड), बंटी चवरे (19, रा. साखर कारखाना परिसर, सांगली) यांचा समावेश आहे.
मृत राजर्धन आयटीआयमध्ये शिक्षण घेत होता. गुरुवारी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर तो साखर कारखान्याच्या बस थांब्यावर उभा होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला तेथून बोलवून घेऊन साखर कारखान्याच्या मुख्य गेटजवळ नेले. तिथे त्याच्यावर कोयता व चाकूने हल्ला केला. यामध्ये तो जागीच मरण पावला होता.

कॉलेजमध्ये संशयित मृत राजवर्धनला ‘टॉर्चर’ करायचे. ही बाब त्याने त्याचे मामा नागेश पाटील (रा. भगत गल्ली, बुधगाव) व चुलत भाऊ अनिल पाटील यांनी संशयितांना राजवर्धनला ‘टॉर्चर’ करू नका, असे समजावून सांगितले. याचा संशयितांना राग आला. तेंव्हापासूने ते राजवर्धनकडे रागाने पहात होते. राजवर्धनही त्यांच्याकडे रागाने पाहू लागला. यातून त्यांच्यातील वैमनस्य वाढत गेले. यातून संशयितांनी त्याची ‘गेम’ केल्याचे ेनिष्पन्न झाले आहे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांनी सांगितले.

Back to top button