सांगलीकरांच्या चवीला अकरा देशांची फळे | पुढारी

सांगलीकरांच्या चवीला अकरा देशांची फळे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीकरांच्या चवीला अकरा देशातील फळे येत आहेत. यांची महिन्याला लाखोंच्या घरात उलाढाल होत आहे. फळासाठी ठराविकच ग्राहक असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. आरोग्यासाठी विदेशातून येणार्‍या किवीला मागणी वाढली आहे.

सांगलीमध्ये न्यूझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, चिली, चीन, थायलंड, चिली आदी अकरा देशातून फळे येतात. विदेशी फळे देशी फळापेक्षा महाग आहेत. ही परदेशी फळे नगाऐवजी वजनावर विकली जातात.

परदेशी फळांना ग्राहक मात्र इतर फळांच्या तुलनेत पाच टक्केच आहे. सांगलीमध्ये या फळांची आवक वाशी आणि मुंबईमधून होते. ही फळे कमी प्रमाणात येत असल्यामुळे यावर विष्णूअण्णा फळमार्केटचे नियंत्रण नाही. दुकानदार थेट यांची आवक करतात. सांगलील सुमारे पंधरा दुकानातून याची विक्री केली जाते. महिन्याला लाखोंच्या घरात याची उलाढाल होते.

याबाबत परदेशी फळांचे विक्रेते हारुण बागवान आणि शहारुख मुन्शी यांनी सांगितले की, परदेशी फळे ही हंगामानुसार येतात.

स्थानिक आणि परदेशी फळांचा हंगाम हा वेगवेगळा आहे. हा आपला द्राक्ष हंगाम संपला असलातरी परदेशी द्राक्षांचा हंगाम सुरू झाला आहे.

कोराना काळानंतर फळांची विक्री झपाट्याने वाढत आहे. वैद्यकीय सल्ला व चांगल्या आरोग्यासाठी म्हणून फळे खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

 

Back to top button