सांगली : तुंग हनुमान देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्गाचा दर्जा जाहीर | पुढारी

सांगली : तुंग हनुमान देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्गाचा दर्जा जाहीर

कसबे डिग्रज; पुढारी वृत्तसेवा : तुंग येथील ग्रामदैवत श्री हनुमान देवस्थानास महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या ठिकाणी प्रत्येक शनिवारी मोठी गर्दी असते. हनुमान जयंतीस मोठी यात्रा भरते. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने हनुमान देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व भाविकांची अनेक वर्षापासून तत्कालीन ग्रामविकास, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी होती.

आ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तुंग हनुमान देवस्थानास शासनाचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. दरम्यान, शासनाच्या या घोषणेचे भाविकांतून स्वागत होत आहे.

Back to top button