सत्तेत आहे म्हणून यंत्रणेचा गैरवापर करू नका : राजू शेट्टी | पुढारी

सत्तेत आहे म्हणून यंत्रणेचा गैरवापर करू नका : राजू शेट्टी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  केवळ सत्तेत आहे, म्हणून यंत्रणेचा गैरवापर करू नये, त्यांनाही भविष्यात विरोधी पक्षात जावे लागेल, त्यावेळी त्यांची काय अवस्था होईल, याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात ते सांगलीत बोलत होते. शेट्टी म्हणाले की, भाजपने सुडाचे राजकारण करू नये, त्यांनाही कधीतरी विरोधी बाकावर बसावे लागेल. सत्तेचा वापर विकासासाठी करायला हवा. सांगलीमध्ये कृष्णा नदी प्रदूषण विरोधात आज आंदोलन होते. या आंदोलनात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील आणि राजू शेट्टी यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनाच्या निमित्ताने दोन्ही  शेतकरी संघटनेचे नेते एकत्र आले होते. आंदोलनानंतर दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करीत एकमेकांची भेट घेतली. एकत्र दोघांनी चहाही घेतला. शेतकरी नेत्यांच्या या जवळीकतेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Back to top button