सांगली : विट्यात कचरा उचलण्यासाठी वापरली जाते चक्क भंगारातली गाडी! | पुढारी

सांगली : विट्यात कचरा उचलण्यासाठी वापरली जाते चक्क भंगारातली गाडी!

विटा : पुढारी वृत्तसेवा : विट्यात पालिकेच्यावतीने शहरात कचरा उचलण्यासाठी वापरलेल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये एका भंगारात गेलेल्या गाडीचा वापर होत आहे, याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी आमदार अनिल बाबर गटाचे माजी नगरसेवक अमर चंद्रकांत शितोळे यांनी सांगलीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे (आरटीओ) केली आहे.

याबाबत माजी नगरसेवक अमर शितोळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विटा पालिकेची एम एच २० सी/१०६३ ही कचरा गाडी शहरातील स्वच्छता सेवा अतंर्गत कार्यरत आहे. वाहन क्रमांकापासून त्या गाडीची सर्व कागदपत्रे बोगस आहेत. शिवाय ही गाडी स्क्रॅपमध्ये अर्थात अक्षरशः भंगारात निघालेली आहे. तरीही सध्या ती विटा पालिकेच्या सेवेत आहे.

यामुळे सर्व कागदपत्राची व परिवहन दस्त नोंदीची त्याच्या संबंधित अधिकाऱ्याच्याकडून सखोल चौकशी व तपासणी करावी. तसेच या गाडीची कोणत्याही प्रकारची कायदेशीर कागदपत्रे नसल्यास हे वाहन ताब्यात घेऊन संबंधितावर कायदेशीर कार्यवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक शितोळे यांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button