सांगली : मांगलेजवळ दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार | पुढारी

सांगली : मांगलेजवळ दुचाकींची समोरासमोर धडक; एक ठार

शिराळा; पुढारी वृत्तसेवा :  मांगले (ता. शिराळा) येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात संदीप विलास हुजरे (वय 40, रा.कांदे, ता. शिराळा) हे ठार झाले तर अन्य दोघेजण जखमी झाले. मंगळवार रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

संदीप हे वारणानगर येथील साखर कारखान्यात नोकरीस होते. मंगळवारी रात्री कामावरून संदीप दुचाकी (एम.एच. 11 -ई 5039) ने घरी निघाले होते. मांगलेनजीक समोरून आलेल्या दुचाकी (एम. एच. 46- एस 2661) ची आणि त्यांच्या दुचाकीची धडक झाली. अपघातात संदीप गंभीर जखमी झाले होते. त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. दोघे जखमी खासगी रुग्णालयात आहेत. अपघाताची नोंद बुधवारी रात्रीपर्यंत शिराळा पोलिस ठाण्यात झाली नव्हती. संदीप यांच्या मागे आई, वडील, चुलते, चुलती, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

Back to top button