मालगावच्या माजी पंचायत समिती सदस्यास कारावास

मालगावच्या माजी पंचायत समिती सदस्यास कारावास
Published on
Updated on

मिरज; पुढारी वृत्तसेवा :  मालगाव (ता. मिरज) येथे एकास धमकावून हवेत गोळीबार करून त्याच्यावर खुनी हल्ला केला होता. या प्रकरणी माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश उर्फ बाळासाहेब तुकाराम भंडारे याच्यासह साथीदारांना न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरी व 1 हजार 500 रुपये दंड ठोठाविण्यात आला.

पंचायत समिती सदस्य प्रकाश उर्फ बाळासाहेब भंडारे व त्याच्या साथीदारांनी वसंत आप्पासाहेब खांडेकर यांना तुम्ही आमचे समाजातील वर्चस्व कमी करताय काय, तुम्हाला जास्त मस्ती आली आहे, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून विनापरवाना रिव्हॉल्व्हर छातीवर रोखून धमकावून त्यानंतर हवेत गोळीबार केला होता. तर रमेश तेलकिरे याने तलवारीने तोंडावर हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. भंडारे यांच्या अन्य साथीदारांनी समाज मंदिरासमोर असलेल्या साहित्याची तोडफोड करून नुकसान केले होते. ही घटना 2012 मध्ये घडली होती.

याबाबत वसंत खांडेकर यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर तत्कालीन पोलिस निरीक्षक के. बी. गवळी यांनी याबाबत तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणावर सुनावणी घेऊन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी बाळासाहेब भंडारे व त्याच्या साथीदारांना एक महिना सश्रम कारावास, सहा महिने सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड, एक वर्ष सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व हत्यार बाळगल्या प्रकरणी आर्म ऍक्ट प्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी स्वतंत्रपणे वेगवेगळी शिक्षा ठोठावली आहे. तसेच पाचशे रुपये दंडाची भरणा न केल्यास आणखीन पंधरा दिवस फक्त सक्तमजुरी ठोठावण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news