सांगली : शिराळा तालुक्यात शाळू, गहू जोमात | पुढारी

सांगली : शिराळा तालुक्यात शाळू, गहू जोमात

शिराळा; पुढारी वृतसेवा :  शिराळा तालुक्यात रब्बी हंगामातील शाळू, गहू पिके जोमात आली आहेत. गहू पिकांची तवरी पडली आहे. ऊस लागणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकर्‍यांनी सोयाबीन, भात आदी पिकांची काढणी, मळणीची कामे पूर्ण करून ऊस लागणीची कामे पूर्ण करीत आणली आहेत.

शिराळा तालुक्यात रब्बी हंगामातील 5 हजार 888 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. तालुक्यात शाळू पिकाची 2245 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. गहू पिकाची 688 हेक्टर पेरणी झाली आहे. मका पिकाची 1792 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. हरभरा पिकाची 958 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. तालुक्यात सूर्यफूल क्षेत्र 4 हेक्टर आहे.

कारखाने एप्रिलअखेर सुरू राहतील

तालुक्यात उसाचे क्षेत्र 8 हजार हेक्टर आहे. आडसाली 1175 हेक्टर असून खोडवा 3034 हेक्टर आहे. साखर कारखान्यांनी लागणीचे ऊस नेण्याचे काम सुरू केले आहे. यावर्षी ऊस क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. खोडवा पिकाचे क्षेत्र 3 हजार हेक्टर आहे. त्यामुळे साखर कारखाने एप्रिलअखेर सुरू राहतील, असा अंदाज आहे.

Back to top button