

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा : येथील महांकाली साखर कारखान्याच्या परिसरात शनिवारी (दि.4) सायंकाळी भीषण आग लागली. भीषण आगीमुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. यामुळे कारखाना परिसरातील वस्तूचे नुकसान झाले आहे. याचा झाडा झुडपांना फटका बसला आहे.
महांकाली कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. कारखाना परिसरात आग लागल्याचे समजतात अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिस, नागरिक एकत्रित येऊन लागलेली आग विझवत होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.