सांगली : महागाईप्रश्नी राष्ट्रवादी काढणार महामोर्चा | पुढारी

सांगली : महागाईप्रश्नी राष्ट्रवादी काढणार महामोर्चा

सांगली : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर काँग्रेसची कार्यालयात बैठक झाली. त्यात वाढत्या महागाईबाबत चर्चा करून केंद्राचा निषेध करण्यात आला. त्या संदर्भात महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज अध्यक्षस्थानी होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी – प्रभावी, प्रगल्भ, तरुण, पुरोगामी विचारांसाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली होती. या करिता दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी संघटनेतील सर्वच फ्रंट सेलच्या पदाधिकारी यांनी एकत्र बैठक आयोजित करून सर्वानी बैठकीला उपस्थित राहून या बैठकीमध्ये देशाच्या, राज्याच्या जिल्ह्याच्या, तालुक्याच्या, सामाजिक, आर्थिक, राजकीय जडणघडणीची चर्चा या बैठकीत प्रामुख्याने होणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे बैठक झाली. त्यात वाढत चाललेल्या महागाईबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. प्रभागांतील नागरिकांच्या समस्याबाबत प्रत्येक प्रभागाचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादीचे कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे, नगरसेवक हरिदास पाटील, योगेंद्र थोरात, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, उत्तम कांबळे, ज्योती आदाटे, युवराज गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कसब्याप्रमाणे हवा बदलत आहे

यावेळी बजाज म्हणाले, नागपूर प्रमाणे कसबा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. त्यामुळे हवा आता बदलत आहे. राष्ट्रवादी घरा-घरापर्यंत पोहचवा. लोकांच्या समस्या ऐकून घ्या.

Back to top button