राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम | पुढारी

राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

सांगली/पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या परीक्षेत सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सोनी येथील प्रमोद चौगुले यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांना 633 गुण मिळाले.

खुल्या गटात शुभम पाटील यांनी, तर महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळविला. आता उमेदवारांना 3 ते 10 मार्च या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येतील. पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. राज्यात पहिले आलेले चौगुले यांचे वडील टेम्पो चालक होते, आई शिलाईचे काम करीत होती. पत्नी एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहेत. कुटुंबाच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे चौगुले यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 2020 च्या परीक्षेतही चौगुले पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यांनी 2021 च्या परीक्षेत पुन्हा प्रयत्न केला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सोनी येथे झाले.

Back to top button