सांगली : तरुणाचे खोटे लग्न लावून देऊन पाच लाखांची फसवणूक | पुढारी

सांगली : तरुणाचे खोटे लग्न लावून देऊन पाच लाखांची फसवणूक

विटा; पुढारी वृत्तसेवा : खोटे लग्न लावून तब्बल ५ लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या विरोधात विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक शिवाजी सावंत ( वय ३९, बामणी, ता. खानापूर ) या तरूणाने विटा पोलिसात फिर्याद दिली आहे.

विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खानापूर तालुक्यातील बामणी येथील दीपक सावंत या तरुणाच्या लग्नासाठी वधू शोध सुरु होता. या गोष्टीचा गैरफायदा घेत अंजना दिलीप मलाईगोल (रा. हुपरी, कोल्हापूर), शिवानंद मठपती स्वामी आणि त्याची पत्नी (रा. गोकाक, बेळगाव) तसेच उमेश वाजंत्री एक स्थळ सुचवले. त्यानुसार त्यांनी दीपकचे लक्ष्मी मल्लाप्पा नलव डे (बैलहुंगल,कर्नाटक) हिच्याशी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी लग्न लावून दिले. मात्र त्यावेळी दीपकचा विश्र्वास संपादन करून लक्ष्मी हिच्याशी खोटे लग्न लावताना रोख ३ लाख १० हजार रुपये आणि १ लाख ५९ हजार ९३२ रूपये किंमतीचे सोने असे एकूण ४ लाख ६९ हजार ९३२ रूपयांचा ऐवज दीपककडून घेतला. यानंतर पुढच्या सात दिवसात संशयितांनी तेथून पलायन केले. याबाबत दीपक सावंत यांनी या पाचजणांच्या विरोधात आर्थिक फसवणूकीची फिर्याद दिली असून त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलंत का?

Back to top button