सांगली : बामणीत शेत जमिनीच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला

विटा; पुढारी वृत्तसेवा : शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादात लाथाबुक्यांनी मारहाण करत चाकूने एकावर हल्ला करण्यात आला. ही घटना बामणी (ता. खानापूर) येथे सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. याबाबत विटा पोलिसात बिपीन शिवाजी माळी (वय ३०, व्यवसाय शेती, रा. बामणी) यांनी दिलेल्या फिर्याद वरून संशयित वसंत रघुनाथ माळी, रघुनाथ जगन्नाथ माळी, प्रविण रघुनाथ माळी आणि आनंदा रघुनाथ माळी (सर्व रा. बामणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, बिपिन माळी आणि वसंत माळी, रघुनाथ माळी प्रवीण माळी आणि आनंदा माळी या चौघांमध्ये शेत जमीनीच्या कारणावरून भांडण झाले होते. याचा राग मनात धरून वसंत माळी, रघुनाथ माळी प्रवीण माळी आणि आनंदा माळी यांनी बिपिन माळी यास लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच वसंत याने त्याच्या हातातील चाकूने बिपीनच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर मांडीवर वार करून जखमी केले. याबाबत विटा पोलिसात संशयित चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.हेही वाचा;
- जत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे लोकार्पण १९ फेब्रुवारी पूर्वी करणार : माजी आमदार जगताप
- रत्नागिरी: सत्विणगाव येथे वन कर्मचाऱ्यांवर हल्ला: २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल
- हातकणंगलेत कॉलमचाच उड्डाण पूल उभारणार : नितीन गडकरींचे आश्वासन