सांगली : खानापूर तालुक्यात तब्बल दोन टन आले पिकाची चोरी | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्यात तब्बल दोन टन आले पिकाची चोरी

विटा; पुढारी वृत्तसेवा : शेतजमीन उकरून ६० हजार रुपये किंमतीचे दोन टन आले पीक चोरून नेल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे. आळसंद या गावातील घटनेमुळे आता तालुक्यात याची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चोरी शनिवारी (दि. १४) दुपारी ३ वाजल्यापासून रविवारी (दि. १५) सकाळी दहा वाजेपर्यंतच्या कालावधीत झाली. याबाबत शेतजमीन मालक गणेश तानाजी माळी यांनी विटा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

विटा पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, आळसंद येथील जमीन गट नंबर ४६ मधील गणेश माळी यांच्या शेतात आले पीकाची लागण करण्यात आली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातील तब्बल दोन टन ओले आले जमिनीतून उकरून पळवून नेले. चोरीस गेलेल्या या मालाची किंमत ६० हजार रुपये इतकी आहे. याबाबत विटा पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button