सांगली : दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या महिला होणार डिजिटल वुमन; इस्लामपुरात 1 जानेवारीपासून कार्यशाळा | पुढारी

सांगली : दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या महिला होणार डिजिटल वुमन; इस्लामपुरात 1 जानेवारीपासून कार्यशाळा

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दै. पुढारी कस्तुरी क्लब इस्लामपूर, सॉफ्टेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट व इस्लामपूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 1 ते 10 जानेवारी या कालावधीत डिजिटल सहेली कार्यशाळा व डिजिटल वुमन 2023 या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सावित्रीच्या लेकी साक्षर तर आहोतच, पण आता डिजिटल साक्षर होणार आहेत.

दहा दिवसांच्या कार्यशाळेत इंटरनेट, ईमेल, सर्चिंग, ब्राऊजींग,फेसबुक, व्हॉटस्अप, इन्स्टाग्राम, दैनंदिन कामाच्या नोंदी, लाईट बिल, फोन बिल, विमा हप्ते ऑनलाईन भरणे, नेट बँकिंग, गुगल पे, लाईट बिल भरणे, मुलांचे अभ्यासविषयक प्रकल्प शोधणे, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन बस, रेल्वे व विमान तिकीट बुकिंग सेवा व शासनाच्या विविध सेवांची माहिती घेण्यासाठी व निरोगी व फीट राहण्यासाठी महिलांना विविध अ‍ॅपचा वापर कसा करावा, या विविध विषयांवर महिलांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

डिजिटल सहेली आजच्या डिजिटल युगातील सुपर वुमन बनण्यासाठी नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर नवा प्रारंभ. ही कार्यशाळा सॉफ्टेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, इस्लामपूर मारूती मंदिराजवळ येथे होणार आहे. या कार्यशाळेसाठी महिलांना आपल्या वेळेनसार बॅच निवडता येणार आहे. कार्यशाळा दररोज एक तास होईल. तरी या कार्यशाळेचा लाभ जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा, यासाठी आजच आपली नाव नोंदणी करून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, नाव नोंदणी संपर्कासाठी दै. पुढारी कस्तुरी क्लब कार्यालय इस्लामपूर. मोबा. 7972724391, 9226110823, 9552059515.

आता किचनची राणी बनणार डिजिटल युगातील सुपर वुमन…

कार्यशाळेनंतर सर्व सहभागी महिलांमध्ये डिजिटल वुमन 2023 ही कॉन्टेस्ट घेण्यात येईल. या स्पर्धेसाठी एकूण 5 फेर्‍या होतील. या स्पर्धेतील भाग्यवान विजेतीला डिजिटल सुपर वुमन 2023 हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी सर्व महिलांना प्रमाणपत्र देण्यात येईल.

Back to top button