सांगली : जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात सांगलीत आंदोलन | पुढारी

सांगली : जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या विरोधात सांगलीत आंदोलन

सांगली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेधार्थ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, राष्ट्रवादी सांगली विधानसभा अध्यक्ष पद्माकर जगदाळे , प्रदेश सचिव शेखर माने, असिफ बावा, बिरेंद्र थोरात, मनगु सरगर, स्वाती पारधी, ज्योती अदाटे, अनिता पांगम, उत्तम कांबळे, युवराज गायकवाड, समीर कुपवाडे, आयुब बारगिर, डॉ.शुभम जाधव, बाळाराम जाधव आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी शहर-जिल्हाध्यक्ष बजाज म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना विधिमंडळ अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करून सरकारने हुकूमशाही मानसिकतेचाच परिचय दिला आहे. त्यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केलं जात असेल, तर सरकारच्या मनात सत्तेचा अहंकार किती खोलपर्यंत पसरला आहे याचाच प्रत्यय येतोय. राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, भाजप नेत्यांनी कसेही वागावे व विरोधी पक्ष नेत्यांनी निमूटपणे सहन करावे ही कसली अपेक्षा ? त्यांचे निलंबन लवकरात लवकर रद्द नाही झाले तर याचे तीव्र पडसाद उमटतील.

हेही वाचलंत का?

Back to top button