सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर खानापूर तालुक्यात राजकीय श्रेयवाद | पुढारी

सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर खानापूर तालुक्यात राजकीय श्रेयवाद

विटा, पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील या टप्प्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर श्रेय वादाचे राजकारण सुरू झाले. बिनविरोध झालेल्या ८ आणि प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ३७ ग्रामपंचायतींमध्ये कोणत्या गटाला किती ठिकाणी सत्ता मिळाली? याबाबत दहावी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यामध्ये शिंदे गटाच्या आमदार बाबर गटाने ४५ पैकी ३१ ग्रामपंचायतींवर दावा सांगितला आहे.

३१ ग्रामपंचायतींवर विजय मिळवल्याचा आमदार बाबर गटाचा दावा

गार्डी , मादळमुठी , वासुंबे ,ढवळेश्वर, धोंडेवाडी, चिखलहोळ, घानवड , वाळूज, भांबर्डे, रेवणगाव ,घोटी बुद्रुक, कुर्ली, लेंगरे, बलवडी(खा), जाधववाडी, करंजे, बेणापूर, हिवरे , बाणूरगड, रामनगर, भाळवणी, पंचलिंग नगर, बलवडी (भा), आळसंद, चिंचणी (मं), कार्वे, बामणी, मोही, जोंधळखिंडी, कळंबी आणि वाझर.

संमिश्र- २ जाखिनवाडी आणि कमळापूर

राष्ट्रवादीकडे २० ग्रामपंचायती : जिल्हा कार्याध्यक्ष मुळीक

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांच्या दाव्यानुसार रेवणगाव, जाखिनवाडी,ऐनवाडी,भूड, वलखड, सुलतानगादे, ताडाचीवाडी, जाधवनगर, भूड, सांगोले, वेजेगाव, कळंबी, कमळापूर, वाझर, आणि हिंगणगादे या नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायती राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत. शिवाय यापूर्वी बिनविरोध झालेल्या पाच ग्रामपंचायतींमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचेच सरपंच आहेत. अशा एकूण २० ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत असा दावा मुळीक यांनी केला आहे

हेही वाचलंत का?

Back to top button