सांगली : नळ पाणी पुरवठ्याचे होणार जिओ टॅगिंग | पुढारी

सांगली : नळ पाणी पुरवठ्याचे होणार जिओ टॅगिंग

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील ७२६ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत ‘स्वच्छ जल से सुरक्षा’ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्व नळ पाणी पुरवठा योजनाच्या सर्व स्रोतांचे जिओ टॅगिंग होणार आहे. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे पाणी गुणवत्ता परीक्षण होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह जाधव यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डुडी म्हणाले, जलशक्ती मंत्रालयामार्फत जलजीवन सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छ जल से सुरक्षा अभियान दि. ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. सध्या याची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील नळपाणी पुरवठा योजनाच्या अस्तित्वातील सर्व स्त्रोताचे जिओ टॅगिंग, पाणी गुणवत्ता परीक्षण तसेच पाणी नमुने तपासणी व त्यासाठी प्रशिक्षण महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. ‘हर घर जल’ या मोबाईल अॅपद्वारे जिल्ह्यातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रमुख स्त्रोताचे हर घर जल या मोबाईल ॲपद्वारे जिओ टॅगिंग पूर्ण करण्यात येत आहे.

ते पुढे म्हणाले, विभागामार्फत स्वच्छ जल से सुरक्षा अभियानांत जिल्ह्यातील प्रत्येक नळपाणी पुरवठा योजनेच्या स्त्रोताची मान्सूनच्या पश्चात कालावधीतील रासायनिक जैविक तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. अभियानांतर्ग एफटीकेकिटद्वारे नियमित पाण गुणवत्ता तपासणी होणार आहे. जिल्ह्यामध्ये पिण्याच्य पाण्याच्या स्त्रोताची रासायनिक जैविक तपासणी करण्यासाठी क्षेत पाणी परीक्षण संच ग्रामपंचयतींना देण्यात आले आहेत. या परीक्षा संचाद्वारे पाण्याची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचातस्तरावर महिलांची निवड करण्यात आली आहे.

Back to top button