सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जानेवारीला इस्लामपुरात | पुढारी

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जानेवारीला इस्लामपुरात

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जानेवारी २०२३ रोजी वाळवा तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा तालुक्यातील हा पहिलाच दौरा आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या बंधूंच्या विवाह सोहळ्यासाठी तसेच विविध विकासकामांच्या भूमिपूजनानिमित्त त्यांचा हा दौरा आहे.

यावेळी त्यांच्याहस्ते इस्लामपूर नगरपालिकेची प्रस्तावित नूतन इमारत, नूतन भाजी मार्केटच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. तत्पूर्वी ते औदुंबर येथील दत्ताचेही दर्शन घेणार आहेत. त्यानंतर वाळवा येथील हुतात्मा संकुलाला सदिच्छा भेटही देणार आहेत. त्यानंतर इस्लामपूर येथे आढावा बैठक व पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आनंदराव पवार यांनी सांगितले.

Back to top button