जत तालुक्यातील विस्तारीत योजनेसाठी दोन हजार कोटींचा निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

जत तालुक्यातील विस्तारीत योजनेसाठी दोन हजार कोटींचा निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जत, पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या ६५ गावासाठी प्रस्तावित असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेला २ हजार कोटींचा निधी मिळणार आहे. येत्या महिन्याभरात (१५ जानेवारी) पर्यंत निविदा काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. ही योजना पूर्णत्वास घेण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी होता. परंतु, या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. दीड वर्षात योजना पूर्णत्वास गेली पाहिजे. तसेच दुष्काळी जत तालुक्यातील तलावे तातडीने भरून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जत पूर्व भागातील गावे कर्नाटकात येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर विविध संघटनेने याविरुद्ध आवाज उठवला होता. यानंतर मुंबई येथे तालुक्यातील ह्या प्रलंबित प्रश्नसाठी तातडीने मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात घोषणा केली.

या बैठकीस पालकमंत्री सुरेश खाडे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खा. संजयकाका पाटील, आ. विक्रमसिंह सावंत, संपर्कप्रमुख योगेश जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी एम. राजा दयानिधी, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी विस्तारीत उपसा सिंचन योजनेसाठीची सुधारित प्रशासकीय मान्यता, ते प्रत्यक्ष काम सुरु होणे यासाठी सर्वच बाबींना प्राधान्य द्या. तांत्रिक बाबी, आराखडे तसे अनुषंगीक बाबी त्वरित पूर्ण करा. तसेच या योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधावा, अशा सूचना दिल्या आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button