सांगली : प्रेमसंबंधातून युवकाचा निर्घृण खून | पुढारी

सांगली : प्रेमसंबंधातून युवकाचा निर्घृण खून

नागज; पुढारी वृत्तसेवा :  आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे तरुणाचा प्रेमसंंबंधातून धारधार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. मारुती ऊर्फ नाना जगन्नाथ कोळेकर (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल श्रीरंग कोळेकर, संजय श्रीरंग कोळेकर व बंडू ऊर्फ अक्षय दामोदर कोळेकर (सर्व रा.आरेवाडी) अशी संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. तिघेही फरार झाले आहे. मारुती कोळेकर हा माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांचा मुलगा आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मारुती कोळेकर याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मारुती याला याबाबत वारंवार सांगूनही त्याने मुलीशी असलेले संबंध तोडले नाहीत. दरम्यान मंगळवारी दुपारी तिघा हल्लेखोरांनी मारुतीला देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यानंतर दरवाजा लावून धारधार हत्याराने त्याच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात मारुती रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. दरम्यान आरडाओरडा ऐकू येताच जवळच्या लोकांनी ट्रस्टच्या कार्यालयाकडे धाव घेतली. दरवाजावर लाथा मारून दरवाजा उघडला. हल्लेखोरांनी तत्काळ घटनास्थळावरून पलायन केले. मारूतीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

Back to top button