सांगली : भाग्यनगर येथे ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू | पुढारी

सांगली : भाग्यनगर येथे ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू

विटा, पुढारी वृत्तसेवा : मशीनच्या सहाय्याने ऊस तोडणीच्या वेळी ट्रॅक्टर मागे घेत असताना चाक अंगावरून गेल्याने वृद्धाचा मृत्यू झाला. धोंडीराम लक्ष्मण काळे (वय ६०) असे मृताचे नाव असून ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उडगी (ता. अक्कलकोट) येथील आहेत. ही घटना रविवारी (दि.२०) रात्री भाग्यनगर (ता. खानापूर) येथे घडली. याबाबत मुलगा राजेंद्र धोंडीराम काळे यांनी ट्रॅक्टर चालक भिराप्पा भिमराय धारेगोंड (रा.अंजुटगी, जि विजापूर) यांच्या विरुद्ध विटा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भाग्यनगर गावचे हद्दीतील सुशिला देवदास जगताप यांच्या काळवटाच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. ही ऊस तोडणी मशीनच्या साहाय्याने चालू असताना भिराप्पा धारेगोंड हे ट्रॅक्टर (क्र.एम एच १० डी व्ही ६६५९) चालवित होते. ट्रॅक्टर मागे घेत असताना पाठीमागे असलेले धोंडीराम काळे यांना धडक देत ट्रॅक्टरचे मोठे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेल्याने त्‍यांचा जागीच मृत्यू झाला. चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  

एसटीच्या संकटकाळात धावून आलेले कंत्राटी चालक वाऱ्यावर; ८०० चालकांवर उपासमारीची वेळ

कोल्‍हापूर : गांधीनगरसह १३ गावांना दूधगंगेतून पाणी योजना लवकरच कार्यान्वित होणार?

फेसबुकी प्रेम पडले महागात : प्रेयसीचा तरुणाला ४० लाखांचा गंडा

Back to top button