पुणे
हडपसर येथे तरूणाला दगडाने मारहाण करून लुटले
पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यायामाला निघालेल्या तरुणाला डिमार्ट जवळील ग्लायडिंग सेंटर जवळ दगडाने व हाताने मारहाण करून त्याच्या पाकिटातील चार हजार लुटल्याचा प्रकार शनिवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी एकाला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
गणेश गौतम कोरडे (21, शेवलेवाडी,हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत किशोर केमदारने (27, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. किशोर हे शनिवारी व्यायामाला चालले असताना त्यांना आरोपी कोरडे ने रस्त्यात गाठले. त्यांना दगडाने मारहाण केली.
नंतर त्याच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले आणि चार हजार रुपये काढून घेतले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करीत आहेत.

