सांगली : जिल्ह्यातील एस.टी.चे बडतर्फ पाच कर्मचारी पुन्हा कामावर | पुढारी

सांगली : जिल्ह्यातील एस.टी.चे बडतर्फ पाच कर्मचारी पुन्हा कामावर

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, यासह विविध मागण्यासाठी संपावर गेल्यामुळे राज्यातील 118 कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले होतेे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश आहे.

एस.टी. चे लाखांवर कर्मचारी संपावर गेले होते. न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला असतानाही कर्मचार्‍यांनी संप सुरूच ठेवला होता. त्यामुळे एस.टी. च्या 118 कर्मचार्‍यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी या कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्यात समाधानाचे वातावरण आहे. त्यात संदीप संजय सनगर (रा. पलूस), दिनेश बाळकृष्ण माने (रा.आंधळी), अभिजित अदिनाथ शिंदे (रा. कुपवाड), नामदेव शंकर ससे (रा. विजयनगर), हनुमंत राजाराम कोळेकर (रा. विसापूर), या कर्मचार्‍यांना पुन्हा कामावर घेण्यात येणार आहे.

Back to top button