सांगली : भाजीपाल्याचे भाव गगनाला; पालेभाज्या आवाक्याबाहेर | पुढारी

सांगली : भाजीपाल्याचे भाव गगनाला; पालेभाज्या आवाक्याबाहेर

सांगली;  पुढारी वृत्तसेवा :  सांगली, मिरजेसह जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे फळ पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. पालेभाज्या तर आवाक्याबाहेर गेल्या आहेत. कोथिंबीरच्या एका पेंडीने पन्नाशी गाठली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

पावसामुळे अनेक पिकांना धोका निर्माण झाला आहे. पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यापासून कडक ऊन पडत असल्याने पालभाज्यांवर रोग पडत आहे. बाजारात त्या आणता येत नसल्याने शेतकर्‍यांना त्या काढून फेकून देण्याची वेळ आली आहे. कोथिंबीरच्या एका पेंडीने पन्नाशी गाठली आहे. दहा रुपयांची सुट्टी मागितली तरी मिळत नसल्याने गृहिणींचे आर्थिक बजेड कोलमडले आहे. वांग्याला मागणी खूप वाढली असली तरी आवक अत्यंत कमी आहे. किलोचा दर 120 रुपयांपर्यंत गेला आहे. आठवड्याला दोन-अडीचशे रुपयांची खरेदी होणारी भाजी आता चारशे रुपयांच्या घरात गेली आहे. पालेभाज्यांची अत्यंत कमी प्रमाणात आवक असल्याने त्याचा दरही खूप वधारला आहे. गवारी 120 रुपये झाली आहे. देशी काकडीचा दर शंभर रुपयांवर गेला आहे. कडीपत्ताही महागला आहे. कांद्याचा दर दररोज कमी-जास्त होत आहे.

किलोमध्ये दर

टोमॅटो : 40 रुपये
दोडका : 80 रुपये
बटाटा : 40 रुपये
कांदा : 30 रुपये
ढबू मिरची : 80 रुपये
गवारी : 120 रुपये
कोबी : 50 रुपये
प्लॉवर : 100 रुपये
पावटा : 100 रुपये

Back to top button