सांगली : विटा येथील श्रीराम नगर मध्ये पडली वीज; दुचाकी जळून खाक

विटा; पुढारी वृत्तसेवा : विटा शहरात सायंकाळी वीजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी शहरातील श्रीराम नगर येथील देशमुख बंधू यांच्या बंद घरावर वीज पडल्याने आग लागली. या आगीत एक लाईट मीटर, एक मोटर सायकल जळून खाक झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. स्थानिक नागरीकांनी प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली.
शहरात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाने सुरवात केली. तब्बल तासभर पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. याच दरम्यान श्रीराम नगर मधील देशमुख नामक व्यक्तीचा बंगला आहे या बंगल्याच्या समोरील बाजूस असलेल्या गॅलरीमध्ये वीज पडली. देशमुख हे सध्या या बंगल्यात राहत नाहीत. त्यामुळे बंगला रिकामा असल्याने कसलीही जीवित हानी झाली नाही. परंतु वीज पडल्याने आग लागली आणि आगीत लाईट मिटर, मोटासायकल जळून खाक झाले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसहित पाणी मारून आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता वाढू नये म्हणून आग विझवण्यासाठी अग्नीशामक बंबालाही बोलावण्यात आले होते.
हेही वाचा