सांगली : दसरा मेळाव्याला जिल्ह्यातून 10 हजार शिवसैनिक जाणार | पुढारी

सांगली : दसरा मेळाव्याला जिल्ह्यातून 10 हजार शिवसैनिक जाणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेच्या मुंबई येथील दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने सर्किट हाऊस येथे बैठक झाली. यावेळी जिल्ह्यातून दहा हजार शिवसैनिक शिवतीर्थावर होणार्‍या दसरा मेळाव्याला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, अभिजित पाटील यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी उपस्थित होते. या ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, नागरिकांनी, शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी बजरंग पाटील, जिल्हाप्रमुख अभिजित पाटील, सुजाता इंगळे, शंभूराज काटकर, चंदन चव्हाण, किशोर ठाणेकर, महादेव मगदूम, मारुती पवार, विशाल रजपूत, नितीन शिंदे, शाहरुख संदे, ऐश्वर्या राडे, मनीषा पाटील, नागनाथ मोठे, प्रदीप माने, संजय सावंत, रुपेश मोकाशी, सुरेश साखळकर, हरिभाऊ लेंगरे उपस्थित होते.

Back to top button