द्राक्ष शेतकर्‍यांची 33 लाखाची फसवणूक

दोघांविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल
sangli Fraud Of Farmer
द्राक्ष शेतकर्‍यांची 33 लाखाची फसवणूकSangli News
Published on
Updated on

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

तासगाव तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची 33 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी तासगाव पोलिसात दोघा दलालाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अशोक डोंगरा (चंदीगड) व रवी माने रा, गोटेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.या प्रकरणी शंकर कुंडलिक माने (रा. सावर्डे) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

sangli Fraud Of Farmer
आटपाडी शेअर मार्केट फसवणुक प्रकरणी संतोष ढेमरेला अटक; पुणे येथे सांगली पोलिसांची कारवाई

या बाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी ; संशयित द्राक्ष दलाल अशोक डोंगरा व त्याचा साथीदार हे दोघे जण तालुक्यातील सावर्डे, मणेराजुरी, चिंचणी, तासगाव, वंजारवाडी व वाघापूर या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून द्राक्ष खरेदी करीत आहेत. त्यामुळे या परिसरात त्यांनी शेतकर्‍यांचा विश्वास संपादन केला होता. त्यातून या परिसरातील शेतकर्‍यांनी जानेवारी ते मार्च या दरम्यान द्राक्ष हंगामात संशयित दलाल डोंगरा व रवी माने याच्यावर विश्वास ठेवून द्राक्ष विक्री केली.

sangli Fraud Of Farmer
बोरिवली : फ्लॅटची परस्पर विक्री करुन वयोवृद्ध महिलेची फसवणुक

संशयित डोंगरा व रवी माने यांनी द्राक्ष खरेदी केल्यापासून शेतकर्‍यांना द्राक्षाचे पैसे देण्यासाठी टाळाटाळ चालू केली. यादरम्यान संशयित दलाल डोंगरा हा तासगाव येथून आपला पसारा गुंडाळून पसार झाला. तेव्हापासून शेतकर्‍यांनी डोंगरा याचा साथीदार रवी माने यांच्याकडे पैशासाठी तगादा लावला पण रवी माने हा टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या प्रकाराने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच शेतकर्‍यांनी तासगाव पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news