सांगली : लाचखोर तलाठ्याच्या साथीदारावर कारवाई | पुढारी

सांगली : लाचखोर तलाठ्याच्या साथीदारावर कारवाई

सांगली :  कापूसखेड येथील लाचखोर तलाठी सुनील बाबूराव जावीर (रा. मिरजवाडी, ता. वाळवा) याच्या साथीदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. गणेश दिनकर पाटील (वय 44, रा. कापूसखेड, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव आहे. लाचप्रकरणात मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात आली. इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.

 याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांची आईचे वारस असलेली बागायत शेतजमीन आहे. ती जमीन इतर वारसांनी तक्रारदार यांच्या आईला विनामोबदला कायम व खूष खरेदीपत्राने लिहून दिले आहे. या खरेदीपत्राचा ऑनलाईन फेरफार करण्याचे काम कापूसखेडच्या तलाठी जावीर याच्याकडे होते. जावीर याने सातबारा उतार्‍यावर नोंदीकरिता पंधरा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदविली.

Back to top button