सांगली : कडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयितास अटक | पुढारी

सांगली : कडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयितास अटक

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा :  घरात कोणी नसल्याचे पाहून येथील अल्पवयीन मुुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित सचिन सुरेश पवार (रा. निमसोड, ता. कडेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना संशयित सचिन एप्रिल 2022 च्या पहिल्या आठवड्यात पीडितेचे आई-वडील बाहेर गेले असताना दुपारी घरी गेला. पीडित एकटीच घरी असल्याचे पाहून संशयित सचिन याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर “हा प्रकार कोणास सांगितला तर तुला व तुझ्या आई व वडिलांनी जिवंत ठेवणार नाही”, अशी धमकी दिली.

त्यांनतर जुलै 2022 मध्ये एके दिवशी पीडित मुलगी कराड येथे कॉलेजला एस.टी. बसने जात असताना बसचा पाठलाग केला. कराड- सैदापूर कॅनॉलजवळ बसमधून पीडित खाली उतरल्यानंतर संशयिताने तिला फोन का उचलत नाही, असे म्हणून आरडा ओरडा करीत शिवीगाळ केली. याबाबत अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. याबाबत पीडितेने कडेगाव पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी संशयित सचिन पवार याला अटक केली.

 

Back to top button