सांगली : आष्ट्यात घरफोडीतील तीन संशयितांना अटक; मुद्देमाल जप्त

सांगली : आष्ट्यात घरफोडीतील तीन संशयितांना अटक; मुद्देमाल जप्त

आष्टा; पुढारी वृत्तसेवा :  येथील गांधीनगरमधील घरफोडीतील तीन संशयितांना आष्टा पोलिसांनी कुरळप पोलिसांच्या मदतीने अटक केली. तसेच त्यांच्याकडून 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले. प्रदीप मानसिंग गोसावी (वय 21), इरफान गुलाब मानेखान (वय 33), स्वप्नील बाजीराव थोरात (वय 22, तिघेही रा. बागणी, ता. वाळवा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरील संशयितांनी 7 ते 9 मे 2022 या कालावधीत आष्टा (गांधीनगर) येथील प्रवीणकुमार शंकर गायकवाड यांचे घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी गायकवाड यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आष्टा – बागणी रस्त्यावर हॉटेल हनुमान याठिकाणी तीन इसम मोटारसायकलवर संशयितरित्या मिळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news