सांगली : वाळवा तालुक्यामध्ये लम्पीचा वाढता प्रादुर्भाव | पुढारी

सांगली : वाळवा तालुक्यामध्ये लम्पीचा वाढता प्रादुर्भाव

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा :  वाळवा तालुक्याच्या काही गावापुरता मर्यादित असलेला जनावरांवरील लम्पीचा प्रादुर्भाव हळूहळू अन्य गावांत वाढू लागला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शनिवारी इटकरे व किल्ले मच्छिंद्रगड येथे दोन जनावरांना या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तालुक्यातील बाधित जनावरांची संख्या 14 वर पोहोचली आहे.

आठवडाभरापूर्वी शेखरवाडी, डोंगरवाडी, ऐतवडे खुर्द, चिकुर्डे या गावांतून जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निर्शनास आले. त्यामुळे शेतकर्‍यांंबरोबरच प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली होती. सातारा जिल्ह्यातून हा रोग येथे आला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शनिवारी इटकरे व कि.म.गड येथे प्रत्येकी एक जणावर लम्पीग्रस्त आढळून आले. आता लम्पी पसरण्याची भीती आहे.

Back to top button