सांगली : कस्तुरी क्लबतर्फे गौरी – गणपती आरास स्पर्धा | पुढारी

सांगली : कस्तुरी क्लबतर्फे गौरी - गणपती आरास स्पर्धा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवानिमित्त दैनिक पुढारी कस्तुरी क्लबतर्फे सांगलीमध्ये गौरी – गणपती आरास ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी विजय खेत्रे (उत्कर्ष भोजनालय), 7 अ‍ॅव्हेन्यू मार्ट सांगली, अर्जुन ऑईल हे प्रायोजक आहेत. दि. 3 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे नियम : गौरी – गणपती आरास 40 सेकंदपर्यंत व्हिडीओ व दोन छायाचित्रे 9607957576 या नंबरवर पाठवावीत. नाव, मोबाईल नंबर, कस्तुरी आयकार्ड फोटो पाठवणे आवश्यक, कस्तुरी क्लबची सन 2022 – 23 साठीची सभासद नोंदणी आवश्यक आहे. विजेत्यांना विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत.

गणपती आरास स्पर्धा बक्षिसे : प्रथम क्रमांक : चांदीचा गणपती, द्वितीय क्रमांक : चांदीचे नाणे, तृतीय क्रमांक : चांदीचे नाणे., तीन उत्तेजनार्थ बक्षिसे गोल्ड प्लेटेड दागिना. गौरी आरास स्पर्धा बक्षिसे : प्रथम क्रमांक : सात लिटर अर्जुन ऑईल, द्वितीय क्रमांक : पाच लिटर अर्जुन ऑईल, तृतीय क्रमांक : तीन लिटर अर्जुन ऑईल. या विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आणि मनोरंजन कार्यक्रमांसाठी आजच कस्तुरी क्लबचे सभासद व्हा. सभासद व्हा आणि मिळवा बॉस कंपनीचा स्टील कोटेड थर्मास. अधिक माहितीसाठी 9607957576 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Back to top button