सांगली : स्कूल बस- ट्रॅक्टरचा कारंदवाडीत अपघात; 15 महिला जखमी | पुढारी

सांगली : स्कूल बस- ट्रॅक्टरचा कारंदवाडीत अपघात; 15 महिला जखमी

आष्टा; पुढारी वृत्तसेवा :  कारंदवाडी (ता.वाळवा) येथील एका पेट्रोल पंपाजवळ रविवारी दुपारी ट्रॅक्टर व स्कूल बसचा अपघात झाला. या
अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकासह बसमधील अंदाजे 10 ते 15 महिला जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद आष्टा पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, या अपघातातील ट्रॅक्टर (एम.एच. 45 एस- 4890) हा कारंदवाडी येथील हाळभागकडून आष्टा – सांगली रस्त्यावर येत होता. तर याच रस्त्यावरून सांगलीकडून आष्ट्याकडे 10 ते 15 महिलांना घेऊन स्कूल बस (एम.एच. 12 एफ. सी -3962) येत होती. या दोन्ही वाहनांची धडक झाली.

अपघातानंतर ट्रॅक्टर नाष्टा सेंटरला जाऊन धडकला तर स्कूल बसने विद्युत खांबाला धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकासह बसमधील 10 ते 15 महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी आष्टा व सांगली येथील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत. स्कूल बसने विद्युत खांबाला धडक दिल्यामुळे कारंदवाडी
भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Back to top button