शिराळामध्ये १३८ मि.मी. पावसाची नोंद | पुढारी

शिराळामध्ये १३८ मि.मी. पावसाची नोंद

चरण; बिपिन पाटील : शिराळा पश्चिम भागात 24 तासांत 138 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. वारणा धरणातून सांडवा व विद्युत निर्मितीतून 5628 क्यूसेक्सने पाणी वारणा नदीत सोडले जात होते. मात्र, पावसाचा जोर वाढल्याने विद्युत निर्मितीतून 1664 व सांडव्यावरून 6875 असा एकूण 9448 क्यूसेक विसर्ग वारणा नदीत सोडला जात आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आरळा-शित्तूर पुलावर पाणी आले आहे.

चरण-सोडोंली पुलाला घासून पाणी जात आहे. बुधवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. आठ दिवसानंतर परिसरात सूर्यदर्शन झाले. नदीकाठची पिके कालपर्यंत दिसत होती. आज धरणातून विसर्ग वारणा नदीपात्रात वाढविल्यामुळे पिके पूर्णपणे बुडाली आहेत.

बुधवारी सकाळी 7 वाजता पाण्याची पातळी 623.95 मीटर तर पाणीसाठा 879.309 द.ल.घ.मी होता. एकूण पाऊस 1720 मि.मी. झाला आहे. धरणात 18088 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू आहे. बुधवारी सकाळी 7 वाजता धरणात 31.05 टी.एम.सी. म्हणजे 87 .83 टक्के पाणीसाठा होता.

Back to top button