सांगली : पैसे न मिळाल्याने एटीएम मशीन रस्त्यात टाकून चोरटे पसार | पुढारी

सांगली : पैसे न मिळाल्याने एटीएम मशीन रस्त्यात टाकून चोरटे पसार

जत: पुढारी वृत्तसेवा : डफळापूर (ता.जत) येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. संशयित चोरटे चारचाकी गाडीतून येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या हाती काहीच न लागल्याने एटीएम मशीन रस्त्यावरच टाकून चोरट्यांनी पलायन केले.

तालुक्यातील डफळापूर येथे जत सांगली रस्त्यानजीक बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी एटीएममध्ये प्रवेश केला. एटीएममधून फोडाफोडी करून मशीनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला; पण चाेरट्यांचा प्रयत्‍न फसला.
एटीएममधून पैसे निघत नसल्याने एटीएम मशिनसह पोबारा करण्याचे नियोजन चोरट्यांनी आखले. एटीएम मशीन गाळ्यातून बाहेर आणले. त्यानंतर त्यांनी रस्त्यातच ती मशीन फेकून पोबारा केला. हा प्रकार  शनिवारी उजेडात आहे. जत पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. याबाबतची फिर्याद शितल खोपरडे यांनी जत पोलिसांत दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button